University of Mumbai : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द; लवकरच नवीन तारखा जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची घोषणा

मुंबई : मुंबई सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका परीक्षांवरही झाला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज, पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबई विद्यापीठाने सोमवार, 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशा आशयाचे पत्रक त्यांनी जारी केले आहे.  हेही वाचा : Mumbai Local Train […]

University of Mumbai : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द; लवकरच नवीन तारखा जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची घोषणा

मुंबई : मुंबई सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका परीक्षांवरही झाला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज, पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबई विद्यापीठाने सोमवार, 6 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशा आशयाचे पत्रक त्यांनी जारी केले आहे. 

हेही वाचा : Mumbai Local Train Services : पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने

गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि सर्वत्र साचलेले पाणी यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच मुख्य विचार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. भारतीय हवामान विभागाने (IMD) जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने 6 जुलै रोजी मुंबईतील सर्व सरकारी, खासगी आणि महापालिकेच्या शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली. सरकारी आणि खासगी कार्यालये मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असेही पालिकेने स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी 7 जुलै रोजी जिल्ह्यातील अंगणवाड्या, बालवाड्या, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद राहतील, अशी घोषणा केली.सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

दरम्यान, ताशी 72-75 किमी वेगाचे सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या 142 घटनांची नोंद मुंबई महापालिकेने केली. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाला सोमवारी ‘हाय अलर्ट’वर राहण्याचे निर्देश दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number