केंद्रीय गृहमंत्री नांदेड दौऱ्यावर

नांदेड १० जून २०२३, प्रतिनिधी :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रच्या दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार शाह शनिवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादला पोहोचतील. येथे ते अनेक बैैठकांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते येथून महाराष्ट्राकडे रवाना होतील. गृहमंत्री नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे यासाठी अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर […]

केंद्रीय गृहमंत्री नांदेड दौऱ्यावर

नांदेड १० जून २०२३, प्रतिनिधी :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रच्या दौऱ्यावर आहेत. वेळापत्रकानुसार शाह शनिवारी सकाळी गुजरातमधील अहमदाबादला पोहोचतील. येथे ते अनेक बैैठकांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी ते येथून महाराष्ट्राकडे रवाना होतील. गृहमंत्री नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे यासाठी अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात शहा यांच्या रॅलीने होणार आहे. यासोबतच मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेणार आहेत. नांदेड हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. गुरु गोविंद सिंग यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ नांदेडमध्ये घालवला होता, त्यामुळे हे ठिकाण शीखांसाठीही खास आहे. अमित शाह नांदेड येथे गुरुद्वारा समितीच्या सदस्यांचीही बैठक घेणार आहेत. गेल्या आठवड्याभरापासून भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचे स्थानिक नेते अक्षरशः सभेच्या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यामुळे नांदेडमध्ये होणाऱ्या आजच्या सभेतून अमित शहा यांच्यासह फडणवीस कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमित शहा शनिवारी रात्री चेन्नईला पोहोचतील. ११ जून रोजी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यानंतर शाह तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये सभा घेणार आहेत. यानंतर मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप तामिळनाडूमध्ये ६६ जाहीर सभा घेणार आहे, ज्या महिनाभर चालणार आहेत. ११ जून रोजी संध्याकाळी अमित शाह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जाणार आहेत. तेथेही त्यांची जाहीर सभा होणार आहे. यानंतर शाह दिल्लीला परततील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number