केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर

पुणे, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरीचिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. यावेळी ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, त्याच्या दौऱ्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर

पुणे, ६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारी रात्री पुण्यात दाखल झाले. ते आज पिंपरीचिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या सहकार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. यावेळी ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, त्याच्या दौऱ्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल त्यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीमही शनिवारी पार पडली.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांचे शनिवारी पुणे विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या नंतर त्यांनी पुण्यातील जे डब्यू मेरिएट हॉटेलवर मुक्काम केला. रविवारी सकाळी ते थेट चिंचवडच्या मोरे प्रेक्षकगृहात दाखल होणार आहे.

अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुण्यात ठीक ठिकाणी महायुती सरकारचे झेंडे लावण्यात आले आहेत. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे झेंडे रस्त्यावर जागो जागी झळकतांना दिसत आहे. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी दोन हजाराहून अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number