Ulhasnagar Love Jihad: इमरान बनला विजय, लग्नानंतर दाखवले खरे रंग; बुरखा, हिजाब, गोमांसासाठी दबाव… उल्हासनगरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने खळबळ

उल्हासनगरमध्ये एका तरुणीने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar Love Jihad: इमरान बनला विजय, लग्नानंतर दाखवले खरे रंग; बुरखा, हिजाब, गोमांसासाठी दबाव… उल्हासनगरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने खळबळ

उल्हासनगरमध्ये एका तरुणीने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, एका मुस्लिम तरुणाने स्वतःचं नाव “विजय” असल्याचं सांगत तिच्याशी ओळख वाढवली आणि प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लग्नानंतर संबंधित तरुणाने आपली खरी ओळख इमरान शेख अशी असल्याचं उघड केलं. त्यानंतर तो पीडित तरुणीला बिहारमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्यावर मुस्लिम रीतीरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिला बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती करण्यात येत होती. तसेच गोमांस खाण्यासाठीही जबरदस्ती केली जात असल्याचा दावा तिने केला आहे. याशिवाय हिंदू देवी-देवतांबाबत अपमानास्पद वक्तव्ये आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे.या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत तरुणीने उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत इमरान शेख, त्याचे दोन भाऊ तसेच आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी इमरान शेख आणि त्याच्या दोन भावांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिस विविध बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number