Ulhasnagar Crime News : भयंकर! पूर्ववैमनस्यातून भर रस्त्यात कुटुंबीयांना मारहाण; सात जणांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल

उल्हासनगरमध्ये महिलांचा गुंडाराज समोर आल्याची धक्कादायक घटना कॅम्प 3 परिसरात घडली आहे.

Ulhasnagar Crime News : भयंकर! पूर्ववैमनस्यातून भर रस्त्यात कुटुंबीयांना मारहाण; सात जणांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये महिलांचा गुंडाराज समोर आल्याची धक्कादायक घटना कॅम्प 3 परिसरात घडली आहे. तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर भररस्त्यात लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता प्रेम राजपुत (वय 50) या आपली बहिण गीता राजपुत व मुलगी अंजली यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना कॅम्प 3 येथील हडकमाता चौक परिसरात आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर नितीन थोरात याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर इतर आरोपींनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : ICU Wedding In Gorakhpur : हातावर मेहंदी, बोहल्यावर चढण्याची घटीका समीप; मात्र नियतीचा खेळ, नवरदेवानं ICU मध्येच केला विवाह

या हल्ल्यात फिर्यादी महिलेचे केस कापण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच गीता राजपुत व अंजली यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ज्युली वाघरी, विणु वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनु उर्फ बाळु वाघरी, महेश वाघरी व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, भर चौकात महिलांकडून होत असलेली मारहाण आणि दहशत पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेदरम्यान अनेक नागरिक उपस्थित असूनही कोणीही मदतीसाठी पुढे आले नसल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओही परिसरात व्हायरल झाला असून उल्हासनगरमध्ये वाढत्या महिला गुंडाराजाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number