नाटोवर युक्रेन नाखूष

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई केली आहे. रशियाच्या लष्करी सैन्यांनी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली. तसेच रशियाने नाटो भागात हल्ला केला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील, असा इशारा नाटोने रशियाला दिला आहे. मात्र, रशिया-युक्रेन हल्ल्यात मदत नाकारून नाटो […]

नाटोवर युक्रेन नाखूष

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई केली आहे. रशियाच्या लष्करी सैन्यांनी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली. तसेच रशियाने नाटो भागात हल्ला केला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील, असा इशारा नाटोने रशियाला दिला आहे. मात्र, रशिया-युक्रेन हल्ल्यात मदत नाकारून नाटो देशांनी आमची साथ सोडल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून नाटो देशांनी आमची साथ सोडल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे तसेच या युद्धात युक्रेनला एकट पाडल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका आणि नाटो देश आम्हाला मदत करतील अशी आशा होती. परंतु या देशांनी आमची साथ सोडली. तरीही मी माझ्या देशाची साथ सोडलेली नाही. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केले नसल्याचा आरोपही झेलेन्स्स्की यांनी केला आहे. तसेच या युद्धामध्ये युक्रेनमधील शहरांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number