जितेंद्र शिंदेनं निर्भयाचा हात खेचून ओढले, तिची दुर्दशा पाहून भैलुमे, भवाळ हसत होते – उज्ज्वल निकम

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी सरकारी वकिल उज्ज्वल निकमांनी नराधमांना फाशी व्हावी असाच युक्तीवाद केला आहे.   तिघांनी कट केला होता, त्याबाबत पुरावे आहेत. दोषींनी केलेले कृत्य वाईट, कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी न्यायालयात केली. जितेंद्र शिंदेनं पीडित मुलीचा हात खेचून ओढलं. पीडितेची दुर्दशा पाहून भैलुमे, भवाळ हसत होते. पीडित […]

जितेंद्र शिंदेनं निर्भयाचा हात खेचून ओढले, तिची दुर्दशा पाहून भैलुमे, भवाळ हसत होते – उज्ज्वल निकम

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी सरकारी वकिल उज्ज्वल निकमांनी नराधमांना फाशी व्हावी असाच युक्तीवाद केला आहे.  

तिघांनी कट केला होता, त्याबाबत पुरावे आहेत. दोषींनी केलेले कृत्य वाईट, कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी न्यायालयात केली.

जितेंद्र शिंदेनं पीडित मुलीचा हात खेचून ओढलं. पीडितेची दुर्दशा पाहून भैलुमे, भवाळ हसत होते. पीडित मुलीवर नितीन, संतोष पाळत ठेवून होते.

पीडित मुलीचे पालक तिला शोधायला गेले, त्यावेळी आरोपी शिंदे दिसला होता. दोषींनी गाडी निर्जनस्थळी नेऊन ठेवली होती.

दोषी भवाळ आणि भैलुमेनं मदत केली होती. दोषींनी अत्याचाराआधी पीडितेचे कपडे फाडले होते.

ते कृत्य एकटा करू शकत नाही. पीडितेच्या शरीरावर जखमा आहेत.  या कृत्यानंतर तिन्ही दोषी एकमेकांच्या संपर्कात होते. दोषींची मानसिक स्थिती चांगली होती. आपण काय करतोय, त्याचे परिणाम यांची दोषींना माहिती होती असा युक्तीवाद उज्ज्वल निकमांनी केला.

दोषींना काहीच पश्चाताप नाही.कमी शिक्षा झाल्यास दोषी पुन्हा असं करणार नाही या पुरावा नाही. तिन्ही दोषींना फाशीच द्या अशी मागणी उज्जवल निकमांनी केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number