जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
सध्या राज्यातील शेतकरांचं वाढतं कर्ज, शेतमालाला नसलेला भाव आणि अवकाळीचा मार या चक्रव्युहात अडकला आहे. त्यातच सरकार आणि व्यापाऱ्यांकडूनही बळीराजा नाडला जात आहे.
यातून सुटका व्हावी याकरता अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. मात्र साताऱ्यातील उडतरे गावाने एक आगळावेगळा ठराव मंजूर करत, राज्य सरकारच्या कानशिलातच लगावली.
1 मे या महाराष्ट्र दिनीच या उडतरे गावाने चक्क महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा ठराव मंजूर केला. राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नसेल. तर आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये जाऊ द्यावं अशी परवानगीच गावकऱ्यांनी सरकारकडे मागितली आहे.
आम्हाला अस्मितेच्या राजकारणापेक्षा पोटाची खळगी भरणं महत्त्वाचं असल्याची भावना या गावकऱ्यांनी पोटतिडकीने जय महाराष्ट्रसमोर मांडली.