15 वर्ष बाईची भांडी घासणारे शरद पवार म्हणतात आमचे हात अदृष्य; उद्धव ठाकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. नेसरी येथील सभेत ठाकरेंनी शासनाच्या शेतकरी धोरणांवर फटकारे ओढलेत. ठाकरे म्हणाले, मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकाव म्हणून. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हें मुख्यमंत्री गुंडाना घेऊन कारभार करत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात […]

15 वर्ष बाईची भांडी घासणारे शरद पवार म्हणतात आमचे हात अदृष्य; उद्धव ठाकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. नेसरी येथील सभेत ठाकरेंनी शासनाच्या शेतकरी धोरणांवर फटकारे ओढलेत.

ठाकरे म्हणाले, मी सरकारवर टीका करतोय हे सरकार 5 वर्ष टिकाव म्हणून. यशवंतराव चव्हाण यांनी वाल्याचा वाल्मिकी कधी केला नाही. पण हें मुख्यमंत्री गुंडाना घेऊन कारभार करत आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणतात खड्डे पडले तर आभाळ पडणार नाही पण सरकार मात्र पडेल. अशी टिकाही उद्धव ठाकरेंनी केली. शरद पवाराना क्रिकेट मधलं काय कळतं तस मला शेतकऱ्यांच्या प्रश्न कळतो.

15 वर्ष बाईची भांडी घासणारे शरद पवार म्हणतात आमचे अदृष्य हात आहेत. गुजरातचा व्यापारी रस्त्यावर उतरून gst कमी करू शकतो तर शिवरायांचा मावळा असणारा शेतकरी रस्त्यावर उतरून gst कमी करू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number