जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेनं इंगा दाखवल्यानंच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. शेतकऱ्यांबाबत भाजपकडून जी विधानं होत होती, त्यानुसार भाजपनं कर्जमाफी दिली नसती. शब्दांनी शेतकऱ्यांचा छळ करणारे सरकारी बाबू आम्हाला नको अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
तसंच आम्ही सत्तेचे लोभी नाही, शेतकऱ्यांसाठी कालही रस्त्यावर होतो आणि आजही रस्त्यावर आहोत. कर्जमाफीचा निर्णय झाला. मात्र, शेतकरी कर्जमुक्त झाला की नाही, यावर शिवसैनिक लक्ष ठेवणार असल्याचंही उद्धव यांनी म्हटलं. तसंच 2016 नव्हे, तर 2017 पर्यंत कर्जमाफीचीही मागणी केली आहे.