नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही पण… उद्धव ठाकरे

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही.  त्या दोघानांही शुभेच्छा आहे, असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विषय टाळला.   तर, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलताना शेतकरी कायम परिस्थितीचा शिकार बनत आला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.     तसेच मंत्रिमंडळ बैठकी आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा […]

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही पण… उद्धव ठाकरे

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही.  त्या दोघानांही शुभेच्छा आहे, असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विषय टाळला.

 

तर, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलताना शेतकरी कायम परिस्थितीचा शिकार बनत आला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.  

 

तसेच मंत्रिमंडळ बैठकी आधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला.

 

त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले आहेत. आम्ही मनापासून भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.  

 

शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं तर ते नरेंद्र मोदींचे गुरु आहेत, असं स्वत: मोदींनी सांगितले.

 

आता त्यांना पद्मविभूषण ही देण्यात आलाय. त्यामुळे कोणाच्या मनात काय येईल. हे सांगता येत नसल्याचा खोचक टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number