जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वेडा झालेला विकास देशाला परवडणार नाही अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला आहे.
मुंबईत अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी भाषणात सरकारवर हल्लाबोल केला.
मुर्दाड मनानं आम्ही कारभार करु शकत नाही. आमची मनं जिवंत आहेत म्हणून सत्तेत असूनही रस्त्यावर उतरलो. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
लोकशाहीच्या नावावर ठोकशाही शिवसेना चालू देणार नाही. इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंनाही टोला मारला.
निवडणूक आल्यानंतर तुम्हाला शिवरायांची आठवण येते. त्या शिवाजी महाराजांच्या या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्या शिवाय राहणार नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.