राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं निर्णायक ठरणार; भाजपची जोरदार फिल्डींग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले.   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून असेल.   29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. […]

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं निर्णायक ठरणार; भाजपची जोरदार फिल्डींग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची

शेवटची तारीख 28 जून असेल.

 

29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 1 जुलै असेल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. राष्ट्रपती पदाच्या

निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले.

 

24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वीच भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपतीची निवड होणार आहे.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून राज्यातील नेत्यांना सबूरीचा सल्ला देण्यात

आल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे आधीचं 20 हजार मतं कमी आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची 25 हजार मुल्य असलेली मतं

भाजपची अत्यंत महत्वाची आहेत.

 

युपी आणि उत्तराखंडच्या यशानंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असली, तरी विजयासाठी 20 हजार मुल्य मतं कमी पडत असल्यानं विजयाचा आकडा गाठण्यासाठी

भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number