जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू असे सांगून जातात परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता लगावला आहे.
शिवसेनाच निवडणुकीतील वचनपूर्ती करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात युती होते आणि तुटते पण, ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जे मनोमिलन आणि युती झालेली आहे, ती दीर्घकाळ अबाधित राहावी अशी आशा
त्यांनी व्यक्त केली.