जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
शिवसेना पक्षप्रनुख उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग दौरा केला. आंगणेवाडीत आयोजित केलेल्या राज्य सरकारच्या कृषी प्रदर्शनाचे यावेळी उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केले. तसेच, भराडी देवीचे दर्शनही घेतले. महाराष्ट्रावर भगवाच भडकू दे असं साकडं त्यांनी यावेळी घातलं.
यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई,गृहराज्यमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत,आमदार वैभव नाइक ,राजन साळवी ,शिवसेनेचे नवनिर्वाचित सचिव मिलिंद नार्वेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंगणेवाड़ी विकास मंडळातर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कार ही करण्यात आला.