पवारांना उत्तर देणार उद्धव ठाकरे – राऊत

सोमवारी शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्याचे शरद पवार यांनी या सोहळ्यात सांगितले. तर, पवारांच्या पुस्तकात उद्धव ठाकरेंबाबत अनेक उल्लेख असून त्या उल्लेखांबाबत उद्धव ठाकरे पवारांना उत्तर देणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. […]

पवारांना उत्तर देणार उद्धव ठाकरे – राऊत

सोमवारी शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केल्याचे शरद पवार यांनी या सोहळ्यात सांगितले. तर, पवारांच्या पुस्तकात उद्धव ठाकरेंबाबत अनेक उल्लेख असून त्या उल्लेखांबाबत उद्धव ठाकरे पवारांना उत्तर देणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

शरद पवारांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकातील त्यांच्या आत्मचरित्रात बरेच गौप्यस्फोट केले असून त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत अनेक उल्लेख केले असल्याचे संजय राऊत यांनी सांगिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडले नाही अशी टीकाही पवारांनी या पुस्तकात केली आहे. तर संघर्ष न करताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याबद्दल पवारांनी ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे.

परंतु, पवारांनी केलेल्या या उल्लेखांबाबत उद्धव ठाकरे पवारांना उत्तर देणार आहेत. तसेच याबाबत उद्धव गटाने आक्षेप घेतले आहेत. आता उद्धव ठाकरे पवारांना नेमके कशाप्रकारे उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number