‘उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसाचं पठण करावं’

गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्‍ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्‍या पोस्‍टर्सवर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आला आहे. याच निमित्ताने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी […]

‘उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसाचं पठण करावं’

गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्‍ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्‍या पोस्‍टर्सवर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आला आहे. याच निमित्ताने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार आहे. हनुमान चालीसा वाचली नाही म्हणून त्यांची सत्ता गेली, पक्ष गेला ,आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसाच पठण करावं, असं राणा दाम्पत्यानी म्हटलं आहे. ६ एप्रिलला होणाऱ्या सामूहिक हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत आणि उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आमचा सामूहिक हनुमान चालीसा पठण आहे. असा दावा देखील नवनीत राणा यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number