बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा शरद पवारांची आपुलकी कुठे गेली होती- उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या बहुचर्चित मुलाखतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत भाषण केले. शरद पवार यांनी मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता. मात्र, बाळासाहेबांना 2000 साली अटक झाली तेव्हा शरद पवारांची ही आपुलकी कुठे गेली होती, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी […]

बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा शरद पवारांची आपुलकी कुठे गेली होती- उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यात झालेल्या बहुचर्चित मुलाखतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत भाषण केले. शरद पवार यांनी मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता.

मात्र, बाळासाहेबांना 2000 साली अटक झाली तेव्हा शरद पवारांची ही आपुलकी कुठे गेली होती, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. परंतु बाळासाहेबांना अटक होईल, यासाठी प्रयत्न केले, असा आरोप उद्धव यांनी केला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवारांची मुलाखत घेतली होती. प्रसारमाध्यमांनी या मुलाखतीविषयी उद्धव यांचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. शरद पवार यांनी मुलाखतीत मुंबई, जातीपातीचे राजकारण या मुद्द्यांवर भाष्य केले होते. त्याबाबत विचारले असता, मुंबई तोडू देणार नाही असं काहीजण सांगतात, पण गरज असल्यावर आम्ही ठाम आहोत.

तुमच्याही काळात मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत होता. त्यावेळीही शिवसेना ठामपणे उभी होती, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले. तसेच आर्थिक आरक्षण द्यावे, हा विचार बाळासाहेबांनी यापूर्वीच मांडला होता. बाळासाहेबांची ही मागणी मान्य झाली असती तर आज जातीपातीच्या भिंती उभ्याच राहिल्या नसत्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Video: राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत जशीच्या तशी…

महाराष्ट्राची अभूतपूर्व मुलाखत, प्रश्न महाराष्ट्राचे ….उत्तरं शरद पवारांची

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number