“तुमची कुवत नसल्यास शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल”, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितलं. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची […]

“तुमची कुवत नसल्यास शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल”, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितलं. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही.

छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करुन शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली.

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

‘गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त इथे जमतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितलं.

तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसं सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई विमानतळावर शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन ‘शिवजयंती केवळ शिवजन्मापुरती मर्यादित नाही. आपण शिवरायांना दैवत का मानतो, तर 300-400 वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थान हिरव्या अंधाराने व्यापून गेला होता. त्याला छेद देऊन तमाम हिंदू, हिंदुस्थानाचा शिवरायांनी पुनर्जन्म घडवला, तो आपल्या पुनर्जन्माचा दिवस. म्हणून इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांना मानाचा मुजरा द्यायला जमतो. शिवरायांना साजेसा सण साजरा करणारा मर्द शिवसैनिक आजही जिवंत आहे, याचा आनंद, अभिमान आहे.’ अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number