जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर दुपारी 4 वाजता सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्याबाबत निवेदन केले.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता बैठकीला उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. कुठल्याही अहवालाची वाट न पाहता, विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांना मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक