अयोध्येत उद्धव ठाकरे रचणार राम मंदिराची वीट!

‘चलो अयोध्या…’ असा नारा देत शिवसेनेने अयोध्येत बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी ‘शिवसेना भवन’ येथे 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलंही आहे. “अयोध्या […]

अयोध्येत उद्धव ठाकरे रचणार राम मंदिराची वीट!

‘चलो अयोध्या…’ असा नारा देत शिवसेनेने अयोध्येत बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी ‘शिवसेना भवन’ येथे 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलंही आहे.

“अयोध्या हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या ताकदीशिवाय अयोध्येत राममंदिर निर्माण होऊ शकत नाही,” असं जन्मेजयशरणजी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावर राममंदिर प्रश्नावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच चढाओढ निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.

राममंदिर निर्मितीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जातीने अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राम मंदिराची वीट रचली जाणार आहे. दसऱ्यानंतर ते अयोध्येला कूच करणार असून त्याची तारीख शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घोषित केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच अयोध्येला जाण्याची तसंच वाराणसीला गंगा आरती करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ अशी घोषणाबाजी करणारी पोस्टर्सही शिवसेनेच्या वतीने यापूर्वी लावण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र वाराणसी मतदारसंघातूनच खासदार म्हणून निवडून आले आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अयोध्या आणि वाराणसी भेट ही निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number