उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार झाली. यामध्ये आघाडीतील नेत्यांनी मोदी व भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत रक्षा बंधन […]

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार झाली. यामध्ये आघाडीतील नेत्यांनी मोदी व भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत रक्षा बंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल, असा चिमटा त्यांनी काढला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत आमची युती आहे. इंडिया आघाडीत त्यांना घेण्याविषयी चर्चा होईल. आंबेडकर यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा आहे का, याबद्दल त्यांनी विचारावे लागेल. शरद पवार म्हणाले की, लोकांना देशात परिवर्तन हवं आहे. अनेक राज्यातून आम्हाला, इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळत आहे. आघाडीतील पक्षांची संख्या वाढत आहे. उद्याच्या बैठकीला २८ पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अशोक चव्हाण म्हणाले की, जसं बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भाऊ रक्षाबंधनदिवशी घेतो. त्याचप्रमाणे इंडियाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आमची आघाडी शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाणारी आहे. इंडिया आघाडीच्या बंगळुरातील बैठकीत २६ पक्ष होते याचा आकडा आता २८ झाला आहे. याआधी इंडिया आघाडीच्या दोन बैठक पार पडल्या आहे. ज्यात २६ पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता इंडिया आघाडीत आणखी दोन पक्ष सहभागी झाले आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकी आधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number