साता-यातील जुना मोटर स्टॅंन्ड परिसरात झालेल्या दारु दुकान हटवण्याच्या वादावरुन साता-यातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
यानंतर पोलिसांनी जमावबंदीच्या उल्लंघना प्रकरणी दोन्ही राजेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.
त्या प्रकरणी खा. उदयनराजेंना सातारा कोर्टाने जामीन मंजुर केला असुन यानंतर खा. उदयनराजेंनी स्व:तची खंत मिडीया समोर बोलुन दाखविली.
“सातारकरांनो कोणावरचा अन्याय सहन करु नका मी ही तो सहन करत नाही अगदी शिवेंद्रराजेंवर अन्याय झाला तरी मी सहन करणार नाही” असं विधान खा. छत्रपती उदयनराजेंनी केलं आहे.