जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहेत.
उदयनराजेंनी साताऱ्यात 6 तासांचा रोड शो देखील केला. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी सातारा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना आता अटक होणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलं.
दरम्यान, या सर्वप्रकाराकडे बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचा इशारा गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिला.