जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी शिवप्रतिष्ठान आहे. उदयनराजे यांना अटक झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही देण्यात आला.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहखात्यानं लक्ष घालून उदयनराजे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केली.
तसंच उदयनराजेंवरील आरोप खोटे आणि राजकीय आहेत. जर त्यांना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटेल असाही इशारा शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आला.