साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र! जोरदार शक्तीप्रदर्शन करणार

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे आज एकत्र निवडणुक अर्ज दाखल करणार असुन दोघेही जबरदस्त शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीतुन भाजपामध्ये आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजिनामा द्यावा लागला होता त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुक लागली असून आज उदयनराजे भोसले भाजपाकडुन लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा भाजपाकडून […]

साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र! जोरदार शक्तीप्रदर्शन करणार

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे आज एकत्र निवडणुक अर्ज दाखल करणार असुन दोघेही जबरदस्त शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीतुन भाजपामध्ये आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजिनामा द्यावा लागला होता त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुक लागली असून आज उदयनराजे भोसले भाजपाकडुन लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तर शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा भाजपाकडून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दोघेही एकत्रित शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोघांच्याही या शक्ती प्रदर्शनाकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. कारण दोघांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आणि आपआपसातील भांडण मिटवत मनोमिलन केलं आहे.

त्यामुळे दोघांच्या या शक्तिप्रदर्शनाने भाजपाला मात्र चांगलाच फायदा होणार आहे. 1998 मध्ये उदयनराजे विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते आणि हा अपवाद सोडला तर भाजपाला पुन्हा या ठिकाणी स्वत:चा उमेदवार निवडुन आणता आला नाही. यामुळे दोन्हीराजेंच शक्तिप्रदर्शन भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. एकुणच काय दोन्ही राजेंच्या या राजधानीत आवाज कोणाचा घुमणार राजेंचा की राष्ट्रवादीचा हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number