यूएईकडून केरळला 700 कोटींची सर्वात मोठी मदत

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली   केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच ठिकाणाहून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीकरिता देशाभरासह जगातील इतर देशांनीही पुढाकार घेतला आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) सर्वात मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यूएईकडून तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे […]

यूएईकडून केरळला 700 कोटींची सर्वात मोठी मदत

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नवी दिल्ली

 

केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच ठिकाणाहून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीकरिता देशाभरासह जगातील इतर देशांनीही पुढाकार घेतला आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) सर्वात मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यूएईकडून तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या 3 भारतीय उद्योजकांनी केरळला 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या 30 ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number