Pune Maval Accident: पुणे हादरले! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांवर काळाची झडप; रात्री दीड वाजता पुणे-मुंबई महामार्गावर…

पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Pune Maval Accident: पुणे हादरले! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांवर काळाची झडप; रात्री दीड वाजता पुणे-मुंबई महामार्गावर…

Pune Maval Accident:

आज तिथीनुसार अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या शिवजन्मोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असं या दोन शिवभक्तांचे नाव होते. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेंव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली, त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले. हातातली शिवज्योत घेऊन गावाकडे धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंती च्या दिवशी शोककळा पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number