राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन संजय

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्यासह बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार हेदेखील उपस्थिती होते. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, […]

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन संजय

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांच्यासह बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार हेदेखील उपस्थिती होते.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सहापैकी ४ जागा निवडून आणणारच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही, भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी विजय आमचाच आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी उमेदवारी शिवसेनेकडून न लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहिर केल्यामुळे संभाजीराजे यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
दरम्यान, नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे शिवेसना नेते संजय पवार यांचे ग्रह बदलले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी सहावा उमदेवार म्हणून शिवसेनेकडून संजय पवार यांची वर्णी लागली आहे. त्यानुसार संजय पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. संजय पवार यांच्या उमेदवारीसाठी मविआचे नेतृत्व विधानभवनात दाखल झाले होते. या सर्व बड्या नेत्यांसमोर संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number