जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे जिल्ह्यातल्या पिंपरीमध्ये ग्रामपंचायत सदस्याने पोलीस शिपायाला गोळी मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे आणि सहकारी शरद हुलावळे यांना अटक करण्यात आलीय.
हे दोघेही एका व्यक्तीसोबत वाद घालत होते. त्या व्यक्तीने कंट्रोल रुमच्या नंबरवर तक्रारीसाठी फोन केला. त्यावेळी पोलीस शिपाई घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उमेश आणि शरदने त्या पोलीस शिपायाला गोळी मारण्याची धमकी दिली.