नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून ठेवलेल्या कीटकनाशकाच्या प्रभावामुळे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आरोही मल्लेश डेबेकर (वय 6 वर्ष) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय 4 वर्ष) असं मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोही मल्लेश डेबेकर वय 6 आणि आराध्या मल्लेश डेबेकर वय 4 या दोन्ही बहिणी आई-वडिलांसोबत घरात झोपल्या होत्या. त्याच खोलीत हरभरा बियाण्यासोबत कीटकनाशक ठेवण्यात आले होते. किटकनाशकाचा प्रभाव झाल्यानं आई-वडील आणि दोन्ही मुलींना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला.
त्यानंतर काल गुरुवारी रोजी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान आरोही आणि आराध्या या दोन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला. उपचारापूर्वीच दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डेबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामीण भागात बियाणे आणि कीटकनाशकांची सुरक्षित साठवणूक करण्याबाबत जनजागृतीची गरज पुन्हा झाली आहे.