Youtubeच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मात्र काही जण या गोष्टीचा गैरफायदा घेत चुकीच्या ठिकाणी याचा वापर करतात. जळगावमध्ये Youtubeच्या माध्यमातून भारतीय चलनी 100 रुपयांच्या नोटांचे कलर फोटो कॉपी करून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन बनावट नोटा बनवणाऱ्या ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे.
जळगावमध्ये Youtubeवर व्हिडीओ बघून भारतीय चलनातील 100 रुपयांच्या नोटांचे बनावट कलर फोटो कॉपी तयार केल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना बनावट नोटा बनवण्याच्या आरोपावर ताब्यात घेतले आहे.
72 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटांसह फोटो कॉपी मशीन आणि नोटा बनावटीकरण करण्याचे साहित्य जप्त केले आहे.
ही घटना तांबापुरा परिसरात सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेल्यानंतर छापा टाकला.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.