Wedding Drama: लग्नात सिनेमासारखा ट्विस्ट! एकाच वधूसाठी 2 नवरदेव मंडपात पोहोचले; शेवटी पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप; सामाजिक प्रतिष्ठेसाठी…

एकाच वधूसाठी दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचल्याने लग्नस्थळी गोंधळ उडाला.

Wedding Drama: लग्नात सिनेमासारखा ट्विस्ट! एकाच वधूसाठी 2 नवरदेव मंडपात पोहोचले; शेवटी पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप; सामाजिक प्रतिष्ठेसाठी…

अमरोहा: उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे घडलेली एक अनोखी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका वधूसाठी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दोन नवरदेव आपल्या-आपल्या वरातींसह पोहोचल्याने लग्नस्थळी मोठा गोंधळ उडाला. या घटनेमुळे उपस्थित पाहुणे, नातेवाईक आणि दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वधूचं लग्न सुरुवातीला एका तरुणासोबत ठरलं होतं. यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, काही कारणांमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हा विवाह रद्द करण्यात आला. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी त्याच दिवशी, त्याच मुहूर्तावर दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरवलं.

दरम्यान, लग्नाच्या दिवशी संभळहून आलेली वरात सर्वप्रथम विवाहस्थळी पोहोचली आणि समारंभाची तयारी सुरू झाली. पण काही वेळातच आधी ठरलेला मोरादाबादचा नवरदेवही आपल्या वरातीसह तेथे दाखल झाला. एकाच वधूसाठी दोन वर एकाच वेळी हजर झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजूंनी आपला हक्क सांगितल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही कुटुंबीयांशी चर्चा केली आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेत वधूलाच विचारले की तिला नेमकं कोणाशी विवाह करायचा आहे.

या वेळी वधूने शांतपणे आपला निर्णय व्यक्त केला आणि तिने दुसऱ्या वराची निवड केली. कुटुंबीयांच्या संमतीने तिचा विवाह पार पडला. त्यानंतर निवड झालेल्या नवरदेवासोबत वधू आनंदाने निघून गेली, तर दुसरा नवरदेव आपल्या वरातीसह रिकाम्या हाताने परतला.

या संपूर्ण घटनेत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी परिस्थिती समजूतदारपणे हाताळत वाद जागेवरच मिटवला. मात्र, या प्रकारामुळे लग्न व्यवस्थापनातील गोंधळ आणि संवादाचा अभाव किती मोठ्या अडचणी निर्माण करू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

ही घटना सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत असून अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला ‘चित्रपटासारखी घटना’ म्हटलं आहे, तर काहींनी अशा प्रकारांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number