अमरावतीत अवकाळीमुळे दोघांचा मृत्यू

शनिवारी महिनाभरात तिसऱ्यांदा विजेचा कडकडाट, वादळीवाऱ्यासह पावसाने अमरावती जिल्हात जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील ५२३ हेक्टर वरील पिके मातीमोल झाली आहेत. याशिवाय दोन व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. ११२ घरांची पडझड आणि २ जनावरांचा मृत्यू झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक २८८ हेक्टर आणि अमरावती […]

अमरावतीत अवकाळीमुळे दोघांचा मृत्यू

शनिवारी महिनाभरात तिसऱ्यांदा विजेचा कडकडाट, वादळीवाऱ्यासह पावसाने अमरावती जिल्हात जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील ५२३ हेक्टर वरील पिके मातीमोल झाली आहेत. याशिवाय दोन व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. ११२ घरांची पडझड आणि २ जनावरांचा मृत्यू झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक २८८ हेक्टर आणि अमरावती तालुक्यात १६० हेक्टर वरील रब्बी पिके आणि फळ पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी गहू कापून ठेवला होता त्यांचा गहू पूर्णतः वाया गेला आहे. जिल्ह्यात ११ एप्रिलपर्यंत आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तळकोकणात गारांचा पाऊस

सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. आंबा, काजू, जांभूळ, कोकम या पिकांना मोटा फटका बसला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

तर दुसरीकडे, मालेगावातील सटाणा तालुक्यात अवकाळीनं झोडपून काढलं आहे. नीताने, पारनेर, आनंदपूर, गौराने या परिसरात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार वादळी वारा आणि गारपीट झाली. करंजाडी परिसरात वादळी वारा, अवकाळी आणि गारपीटीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.

‘मदतीबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा’

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, या नुकसानग्रस्त परिस्थितीचे लवकरच पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कृषीपमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number