जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशभरातील 10 लाखांहून जास्त बँक कर्मचारी आजपासून म्हणजेच बुधवारपासून 2 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील ५५०० शाखांमधील कामकाज बंद असेल.
हे सर्व इंडियन बंक असोसिएशन (आयबीए) कडून वेतनात फक्त 2% वाढीला विरोध करत आहेत. तथापि, 5 मे रोजी या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत आयबीएने हा प्रस्ताव दिला होता. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेतनात 2% वाढीला काहीही अर्थ नाही. 30 आणि 31 मेच्या संपामुळे या महिन्याच्या पगारांवर परिणाम होऊ शकतो. एटीएम ट्रान्झॅक्शनही प्रभावित होऊ शकतात.संपादरम्यान नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आदी सेवा सुरू राहतील. पण प्रत्यक्ष बँकांमधील कामकाज बंद असेल.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या
या मागण्यांवरून युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि आयबीएदरम्यान 2 मे 2017 पासून 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान 13 बैठका झाल्या होत्या. नुकतीच 5 मे रोजी या मुद्द्यावर शेवटची चर्चा झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून पेंडिंग आहे.
कोणकोणत्या बँकांमध्ये संप?