‘नो बॉल’ टाकला म्हणून आयुष्याचाच गेम केला

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर क्रिकेटच्या सामन्यात नो बॉल टाकल्याने दोन गटांत प्रचंड हाणामारी झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेंवाडी या भागात घडली. क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकल्यामुळे दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आणि काही वेळातच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात निलेश काळे व दादा गव्हाणे हे जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारच्या […]

‘नो बॉल’ टाकला म्हणून आयुष्याचाच गेम केला

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

क्रिकेटच्या सामन्यात नो बॉल टाकल्याने दोन गटांत प्रचंड हाणामारी झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेंवाडी या भागात घडली. क्रिकेट सामन्यात नो बॉल टाकल्यामुळे दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आणि काही वेळातच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात निलेश काळे व दादा गव्हाणे हे जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गव्हाणेवाडी गावातील मोटे वाडी येथे ओम साई तरुण मंडळाने क्रिकेटचे सामन्याचे आयोजन केले होते. क्रिकेट सामन्यात नो बॉलवरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीनंतर ओम साई तरुण मंडळाचे कार्यकर्ते पळून गेले. मात्र, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही गटातील खेळडू आपापसात भिडले. आणि गोळीबार करण्यात आला. यामध्ये निलेश काळे नामक युवकाला गोळी लागली तर दादा गव्हाणे याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number