रायगडावर अडीच लाख शिवप्रेमी पोहोचले

यंदा रायगडावर ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी अडीच लाख शिवप्रेमी रायगडावर गेले आहेत. यावर्षी गडावर भाविकांची अफाट गर्दी झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. तर; ठिकठिकाणी विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. अश्या सर्व बाबी असल्या तरीही काही भाविकांना मात्र गडावर जात आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. […]

रायगडावर अडीच लाख शिवप्रेमी पोहोचले

यंदा रायगडावर ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी अडीच लाख शिवप्रेमी रायगडावर गेले आहेत. यावर्षी गडावर भाविकांची अफाट गर्दी झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. तर; ठिकठिकाणी विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. अश्या सर्व बाबी असल्या तरीही काही भाविकांना मात्र गडावर जात आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

शिवभक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मोठी गर्दी जमली. भाविकांच्या अफाट गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरआव्हान आहे. नाईलाजास्तव असंख्य शिवभक्त माघारी फिरले आहेत.

गडाखाली जवळपास ५०- ७५ हजार भाविक जमले आहेत. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगादेखील लागलेल्या आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number