Twisha Sharma Case: त्विषा शर्मा प्रकरणाचा घटनाक्रम, जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं ?

याप्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा सासरच्यांविरुद्ध दाखल केला होता. 12 मे रोजी संध्याकाळी 8 च्या सुमारास त्विषा शर्मा मृत्यू  झाला होता.

Twisha Sharma Case: त्विषा शर्मा प्रकरणाचा घटनाक्रम, जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं ?

नोएडा येथे राहणाऱ्या त्विषा शर्माच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे.   लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद परिस्थितीत तिचा मृत्यू झाला. भोपाळस्थित वकील समर्थ सिंह यांच्याशी त्यांचा डिसेंबर 2025 मध्ये विवाह झाला होता. समर्थचे वडील निवृत्त न्यायाधीश असून आई गिरीबाला सिंह याही माजी न्यायिक अधिकारी आहेत. त्विषाचा सासरी छळ  झाला, असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा सासरच्यांविरुद्ध दाखल केला होता. 12 मे रोजी संध्याकाळी 8 च्या सुमारास त्विषा शर्मा मृत्यू  झाला होता.

याप्रकरणी  पती समर्थ आणि सासू निवृत्त न्यायाधीश गिरबालासिंहविरोधात गुन्हे दाखल झाले.  सासूला अटकपूर्व जामीन मंजूर झाला. मात्र पती समर्थ फरार झाला होता. याप्रकरणी म. प्रदेश सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली. त्विषाला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीयांनी  म. प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन केलं. त्यानंतर फरार पतीचा  जामीन अर्ज भोपाळ कोर्टानं फेटाळला. नंतर लगेच त्विषाच्या कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला सीबीआय चौकशीचं आश्वासन दिलं.  पहिल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचा आरोप त्विषाच्या कुटुंबीयांनी केला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेमची मागणी केली. मात्र ही याचिता  भोपाळ कोर्टानं फेटाळली. दरम्याने 20 मे 2026 रोजी गिरबाला सिंहला चौकशीसाठी हजर राहण्याची तिसऱ्यांदा पोलिसांची नोटीस मिळाली. त्याचवेळी
फरार पतीकडून पुन्हा जामिनासाठी याचिका केली. 22 मे 2026 रोजी  फरार पती शरण येण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.  जबलपूर कोर्ट परिसरात पोलिसांकडून अटक करण्यात आली.  त्यानंतर 24 मे 2026 म. प्रदेश हायकोर्टाकडून दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेमला परवानगी मिळाली. 

23 मे 2026  पोस्टमॉर्टेमसाठी नवी दिल्लीतील एम्सचं पथक भोपाळसाठी रवाना झाले.  24 मे 2026  त्विषाच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेम करण्यात आले. दरम्याने आता त्विषा शर्मा प्रकरणा  सीबीआय चौकशीची  मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number