वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना बॉलीवुडचे आइडल कपल मानले जाते, मात्र ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोला पाहता या गोष्टीबाबत थोडा विचार करावा लागत आहे. कारण ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे अक्षयवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विंकलने आपल्या इंस्टाग्रामवर अक्षय कुमारचा एक फोटो शेअर करत लिहले आहे की – ‘काश याने माझ्याकडेदेखील असचं पाहिलं असतं जसं तो त्याच्या समोरील ग्रीन टी ‘Crème brulee’कडे बघत आहे.
ट्विंकलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ट्विंकलही दिसत आहे आणि अक्षय आपल्या ग्रीन टी Crème bruleeला पाहून हसत आहे.
सध्या ट्विंकल खन्ना रोमनियातील टीटू या शहरात अक्षय सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. आणि त्यावेळचाचं एक फोटो ट्विंकलने थोड्या हटके अंदाजात सोशल मीडियावर शेअर केला आहे.
I wish he looked at me the way he is looking at his green tea creme brûlée :)A tiny restaurant with the most delicious food #Titu #hiddengem A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on