“तर भारताने मालदिववर हल्ला करावा…” स्वामींच्या ट्विटने खळबळ

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी मालदिव प्रकरणी ट्विटमुळे त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या एका ट्विटमुळे भारत आणि मालदिव दरम्यानचे संबध ताणले गेले आहे. स्वामी यांनी एका ट्विटमध्ये मालदिवमध्ये होणाऱ्या निवडणूकांमध्ये गैरप्रकार झाल्यास भारताने मालदिववर हल्ला करावा, असं धक्कादायक मत व्यक्त केलं होतं. https://t.co/nazyiRCOKs: India should […]

“तर भारताने मालदिववर हल्ला करावा…” स्वामींच्या ट्विटने खळबळ

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी मालदिव प्रकरणी ट्विटमुळे त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या एका ट्विटमुळे भारत आणि मालदिव दरम्यानचे संबध ताणले गेले आहे.

स्वामी यांनी एका ट्विटमध्ये मालदिवमध्ये होणाऱ्या निवडणूकांमध्ये गैरप्रकार झाल्यास भारताने मालदिववर हल्ला करावा, असं धक्कादायक मत व्यक्त केलं होतं.

या ट्विटमुळे मालदिव सरकार अतिशय नाराज झालं आहे. मालदिवच्या परराष्ट्र सचिवांनी भारताचे उचायुक्त अखिलेश मिश्रा यांना रविवारी बोलवून घेत, त्यांच्याकडे या ट्विटबद्दल कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.
दूसरीकडे स्वामी यांच्या ट्विटशी भारत सरकारचा काही संबध नाही. हे त्यांचं खासगी मत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मालदिवमध्ये 23 सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सत्ता हस्तगत करुन तसंच आणीबाणी घोषित करून विरोधकांची धरपकड केली आहे. अब्दुल्ला सरकार आल्यापासून भारतासोबतचे संबंध कमी करण्यावर जोर दिला जातोय.

मालदिव चीनच्या कच्छपी लागल्याचं चित्र आहे. काही महिन्यापूर्वी भारताने दिलेले लष्करी हेलिकॉप्टरही परत करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला होता.

याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट हे मालदिवसोबतचे संबंध आणखी बिघडवण्याचं काम करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

याउलट सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आणखी एक ट्विट करून आपलं आधीचं ट्विट ‘जर, तर’ च्या भाषेत असूनही जर त्याने मालदिव सरकार घाबरत असेल, तर याचा अर्थ नक्कीच त्यांच्या मनात काळंबेरं आहे, अशा अर्थाचं आणखी एक ट्विट केलं आहे. मालदिवमधील आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बारताने हे पाऊल उचलायला हवं, असं म्हणत या वादाला फोडणी दिली आहे.

एवढंच नव्हे, तर आपल्या सर्वच शेजारी राष्ट्रांवर अशा प्रकारे लक्ष ठेवायला हवं असंही एका ट्विटमध्ये त्याने म्हटलंय. मात्र त्यांच्या या वादग्रस्त ट्विट्समुळे आंतरराष्ट्रीय धोरणांवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number