बॉलीवूडमधील ही ज्येष्ठ अभिनेत्री हरपली…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘निमकी मुखिया’मधील इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या रिता भादुरी यांचे निधन झाले आहे. रिता भादुरी (62) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अाज दुपारी 12 वाजता अंधेरी चकाला येथील पारशिवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. त्यांच्या दु:खद निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रिता भादुरी या अनेक मालिका आणि […]

बॉलीवूडमधील ही ज्येष्ठ अभिनेत्री हरपली…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘निमकी मुखिया’मधील इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या रिता भादुरी यांचे निधन झाले आहे. रिता भादुरी (62) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अाज दुपारी 12 वाजता अंधेरी चकाला येथील पारशिवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.

त्यांच्या दु:खद निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रिता भादुरी या अनेक मालिका आणि चित्रपटांतील प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांच्या निधनाची माहिती ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून रिता यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना किडनीचा त्रास होत होता. 

प्रकृती चांगली नसूनही रिता शूटिंग करत होत्या, सेटवर जेव्हा त्यांना वेळ मिळायचा, त्या आराम करायच्या.

रिता भादुरी यांची खराब प्रकृती आणि कामासाठी त्यांची आस्था पाहून टीवी मालिका निमकी मुखियामध्ये त्यांना त्यांच्या सवडीप्रमाणे शूटिंग शेड्यूल ठेवण्यात आले होते.

तारक मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन…

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number