Turbhe Crime: शारीरिक सुखाची मागणी नाकारताच संताप; ज्येष्ठ महिलेचा घेतला जीव , मोहम्मदला नेपाळमधून अटक

तुर्भेतील महिलेच्या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणात फरार आरोपीला नेपाळमधून अटक करण्यात आली.

Turbhe Crime: शारीरिक सुखाची मागणी नाकारताच संताप; ज्येष्ठ महिलेचा घेतला जीव , मोहम्मदला नेपाळमधून अटक

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात घडलेल्या  मार्जिना मंडल (50) हत्येप्रकरणाचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अख्तर याला एपीएमसी पोलिसांनी नेपाळमधून अटक करून नवी मुंबईत आणले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे. ही घटना 13 मार्च रोजी समोर आली होती. तुर्भे सेक्टर 22 मधील एका निर्माणाधीन इमारतीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, मृत महिलेची ओळख मार्जिना मंडल अशी पटली.

प्राथमिक तपासात महिलेचा काही अनैतिक व्यवहारांशी संबंध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू ठेवला. मात्र, घटनेच्या वेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न झाल्यामुळे तपासात अडथळे आले.यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. घटनेच्या वेळी महिलेच्या संपर्कात असलेला एक मोबाईल अचानक बंद झाल्याचे आढळले. त्या मोबाईलचा माग काढत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोच साधली. आरोपी मोहम्मद अख्तर हा मूळचा बिहारचा असून, तो घटनानंतर फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी बिहारमध्ये पथक पाठवले, मात्र तो तिथूनही निसटला. पुढे तो नेपाळमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसरे पथक तेथे रवाना केले. अखेर झापा जिल्ह्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपीने पैशांच्या वादातून संतापाच्या भरात हल्ला करून महिलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number