शेतकऱ्यांच्या आशेवरही पाणी, नाफेड, एफसीआयकडे शेतकऱ्यांची नोंदणीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नोंदणी केल्यानं आपल्या तुरीची खरेदी होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरही पाणी फिरलं आहे. कारण नाफेड आणि एफसीआय केंद्रात तशी नोंदणीच करण्यात आली नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.   नाफेड आणि एफसीआयनं फक्त खरेदी केलेल्या तुरीची नोंदणी केली. काही केंद्रावर तर तशी नोंदणीही नाही. तर काही केंद्रांवरील नोंदणी […]

शेतकऱ्यांच्या आशेवरही पाणी, नाफेड, एफसीआयकडे शेतकऱ्यांची नोंदणीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नोंदणी केल्यानं आपल्या तुरीची खरेदी होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरही पाणी फिरलं आहे. कारण नाफेड आणि एफसीआय केंद्रात तशी नोंदणीच करण्यात आली नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.

 

नाफेड आणि एफसीआयनं फक्त खरेदी केलेल्या तुरीची नोंदणी केली. काही केंद्रावर तर तशी नोंदणीही नाही. तर काही केंद्रांवरील नोंदणी वह्याच गायब करण्यात आल्या.

 

मुदत संपल्यानंतर नाफेडनं तूर खरेदी बंद केली. मात्र लाखो क्विंटल तुरीची खरेदीच झालेली नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होणार, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. मात्र हे आश्वासनही आता हवेत विरल्यात जमा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number