का होतो तुकाराम मुंढेंना सगळीकडेच विरोध?

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   तुकाराम मुंढे…आयएएस…भारतीय प्रशासकिय सेवेतील एक तडफदार अधिकारी. कमालीचे प्रामाणिक अशी प्रतिमा. मात्र त्याचवेळी त्यांची जेथे नियुक्ती असते तेथे तेथे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांचे समर्थक सांगतात. तुकाराम मुंढे प्रामाणिक आहेत. त्यामुळे भ्रष्ट राजकारणी, इतर प्रवृत्ती त्यांना विरोध करतात. तर दुसरीकडे मुंढे विरोधक म्हणतात हा अधिकारी सर्वांना कस्पटासमान लेखतो. हडेलहप्पीनं वागतो. त्यामुळे […]

का होतो तुकाराम मुंढेंना सगळीकडेच विरोध?

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

तुकाराम मुंढे…आयएएस…भारतीय प्रशासकिय सेवेतील एक तडफदार अधिकारी. कमालीचे प्रामाणिक अशी प्रतिमा. मात्र त्याचवेळी त्यांची जेथे नियुक्ती असते तेथे तेथे वादाच्या भोवऱ्यात सापडतात.

त्यांचे समर्थक सांगतात. तुकाराम मुंढे प्रामाणिक आहेत. त्यामुळे भ्रष्ट राजकारणी, इतर प्रवृत्ती त्यांना विरोध करतात. तर दुसरीकडे मुंढे विरोधक म्हणतात हा अधिकारी सर्वांना कस्पटासमान लेखतो. हडेलहप्पीनं वागतो. त्यामुळे विरोध हा होणारच.

आता पीएमपीएमएलमधील त्यांच्या नियुक्तीतही ते वादाच्या भोवऱ्यात लापडलेयत.  त्यामुळेच तुकाराम मुंढेंना सगळीकडेच विरोध का होतो? असा प्रश्ना उपस्तित झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number