नवी मुंबईतून पुण्यात गेलेल्या तुकाराम मुंडेची फक्त 11 महिन्यातच नाशिकमध्ये बदली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची 11 महिन्यातच पून्हा बदली झाली आहे. तुकाराम मुंडेंची नाशिक महापालिकेत बदली झाली आहे. पुण्यात रुजू होण्यापूर्वी तुकाराम मुंडेंकडे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार होता. नवी मुंबईत त्यांना प्रचंड विरोध झाला. लोकप्रतिनीधी विरुद्ध तुकाराम मुंडे असा संघर्ष सुरु होता. […]

नवी मुंबईतून पुण्यात गेलेल्या तुकाराम मुंडेची फक्त 11 महिन्यातच नाशिकमध्ये बदली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची 11 महिन्यातच पून्हा बदली झाली आहे. तुकाराम मुंडेंची नाशिक महापालिकेत बदली झाली आहे.

पुण्यात रुजू होण्यापूर्वी तुकाराम मुंडेंकडे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार होता. नवी मुंबईत त्यांना प्रचंड विरोध झाला. लोकप्रतिनीधी विरुद्ध तुकाराम मुंडे असा संघर्ष सुरु होता. यानंतर त्यांच्या बदलीची जोरदार मागणी करण्यात येत होती. अखेरीस त्यांची पुण्यात बदली झाली.   

पुण्यातही तुकाराम मुंडेला विरोध पहायला मिळाला. अखेर आता अवघ्या 11 महिन्यातच त्यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे.

 नाशिकचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची मुंबईत बदली झाली आहे. यामुळे तुकाराम मुंडे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लवकरच मुंडे पदभार स्वीकारणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number