Tukaram Mundhe on Mumbai Hotel : वांद्रे, बोरीवली, अंधेरीसह अनेक ठिकाणी तुकाराम मुंढे यांची ‘मुंढे स्टाईल’ कारवाई; मुंबईत 6 नामांकित हॉटेल्सना टाळे

25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर भेसळयुक्त कंपन्यांना तसेच विक्रेत्यांना सळो की पळो करून सोडलं आहे.

Tukaram Mundhe on Mumbai Hotel : वांद्रे, बोरीवली, अंधेरीसह अनेक ठिकाणी तुकाराम मुंढे यांची ‘मुंढे स्टाईल’ कारवाई; मुंबईत 6 नामांकित हॉटेल्सना टाळे

25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर भेसळयुक्त कंपन्यांना तसेच विक्रेत्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. 'नियम पाळा, नाहीतर कारवाईला सामोरे जा' अशा कडक भूमिकेसह तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील सहा हॉटेल्सना 'मुंढे स्टाईल' कारवाईचा दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी सोमवारी मुंबईतील तब्बल 6 बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. 

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्यानुसार नुकतेच तुकाराम मुंढे यांनी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे आता सर्व व्यावसायिकांना बंधनकारक असल्याचे सांगितले. यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे, बोरीवली, भांडुप आणि नरिमन पॉइंट येथील बड्या समूहाच्या रेस्टॉरंटलाही सोडले नाही. 

हेही वाचा- TET Exam 2026 In Maharashtra : विद्यार्थ्यांना दिलासा! 'TET पुनर्परीक्षा निःशुल्क घेणार'; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची अधिवेशनात माहिती

नरिमन पॉइंट तेथील आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्स अँड कॅफे प्रा. लि. तर्फे चालवल्या जाणाऱ्या 'फ्लिट अँड वार्सा' या रेस्टॉरंटवर एफडीएची धाड पडली. त्यावेळेस अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचा प्रकार आढूळ आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी या हायप्रोफाईल रेस्टॉरंटचे लायसन्स निलंबित करण्याचे आदेश दिले.

यावेळी सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेल गोपालकृष्ण, अंधेरीमधील कराक एंटरप्रायझेस, वांद्रे येथील मद्रास डायरीज, बोरीवली येथील एम. के. बेकरी आणि भांडुप येथील हॉटेल श्रीकृष्ण या नामांकित रेस्टॉरंटला तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा दणका बसला आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता मुंबईतील अस्वच्छ आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या हॉटेल्सविरुद्ध आपला मोर्चा वळवला असून,अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या या सहाही आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करून मुंढे यांनी संपूर्ण मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीला कडक इशारा दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number