Tukaram Mundhe On Saoji Controversy : तुकाराम मुंढे नव्या वादाच्या विळख्यात! सावजी मटणाच्या वादावर पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले, "माफी मागण्याचा प्रश्न…"

सावजीवरून केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे रिअल लाईफ सिंघम अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादाच्या विळख्यात सापडलेत.

Tukaram Mundhe On Saoji Controversy : तुकाराम मुंढे नव्या वादाच्या विळख्यात! सावजी मटणाच्या वादावर पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले, &quotमाफी मागण्याचा प्रश्न…&quot

सावजीवरून केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे रिअल लाईफ सिंघम अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादाच्या विळख्यात सापडलेत. अमरावतीतील एका कार्यक्रमात "नागपूरचं सावजी खाल्लं तर एका महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल" असे वक्तव्य त्यांनी केलं होत. सावजी जेवणाबाबतचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मुंढे यांच्या या विधानाच्या विरोधात अनेक सावजी हॉटेल चालक आणि सावजीप्रेमी रस्त्यावर उतरले आहे.

सावजी मटण ही केवळ पाककृती नाहीये, तर ती विदर्भीय खाद्य संस्कृती आहे, असं म्हणत विदर्भीयांनी मुंढे यांच्यावर हल्ला चढवला आहे. सावजीप्रेमी आणि व्यावसायिकांनी हे वक्तव्य सावजी खाद्यसंस्कृतीची बदनामी करणारे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांनी केलेलं वक्तव्य मागे घ्यावे आणि विदर्भातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा- Washim News: तुकाराम मुंडेंचा नॉनस्टॉप धडाका! वाशिममध्ये एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा साठा जप्त करत माफियांवर मकोका

यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, माझे वक्तव्य नीट ऐकल्यास लक्षात येईल की ते पूर्णपणे माझे वैयक्तिक मत होते. मी कोणालाही सावजी खाऊ नका असा सल्ला दिला नाही किंवा इतर कोणी आजारी पडेल असे म्हटले नाही. मी काही वर्षापूर्वी एका मित्रासोबत गेलो असताना अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे मी तो पदार्थ टाळला होता. हा माझा वैयक्तिक अनुभव होता. त्यामुळे या प्रकरणात माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

दरम्यान या सर्व वादावर तुकाराम मुंढेंनी प्रतिक्रिया देत माफी मागण्यास नकार दिला आहे. सावजी व्यवसायाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा हलबा समाज युवा संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हलबा समाज युवा संघटनेने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number