Tukaram Mundhe Mother Passed Away : तुकाराम मुंढे यांना मातृशोक! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; तातडीने पुण्याकडे रवाना

तुकाराम मुंढे हे कार्यालयीन कामाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये होते. ही बातमी मिळताच ते तातडीने विमानाने पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Tukaram Mundhe Mother Passed Away : तुकाराम मुंढे यांना मातृशोक! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; तातडीने पुण्याकडे रवाना

Tukaram Mundhe: आपल्या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे पुण्यात निधन झाले. त्या साधारण 100 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंढे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालमधून तुकाराम मुंढे पुण्याकडे रवाना
प्राप्त माहितीनुसार, मातोश्रींच्या निधनाची वार्ता समजली तेव्हा तुकाराम मुंढे हे कार्यालयीन कामाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये होते. ही बातमी मिळताच ते तातडीने विमानाने पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्यातून त्यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील त्यांच्या 'ताडसोना' या मूळगावी नेण्यात येणार आहे.

उद्या अंत्यसंस्कार
आसराबाई मुंढे यांच्यावर उद्या, 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळ गावी (ताडसोना, जि. बीड) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तुकाराम मुंढे यांच्यासह मोठा परिवार आहे.

हेही वाचा – Bhondubaba Navnath Gawali: आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप उघड; अंगात येण्याचं ढोंग करून महिलांशी करायचा अश्लील चाळे, गुन्हा दाखल

कोण आहेत तुकाराम मुंढे?  
2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची ओळख एक निर्भीड आणि पारदर्शक अधिकारी म्हणून आहे. त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. मुंढे यांच्या बदल्यांची नेहमीच चर्चा होत आली आहे. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे अनेकदा राजकीय संघर्ष निर्माण होऊन त्यांच्या बदल्या झाल्या, तरीही त्यांनी आपल्या कामाची पद्धत बदलली नाही. नुकतीच त्यांची मंत्रालयात प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ अत्यंत गाजला. त्यांनी नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध आणि अनियमिततेविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number