सोलापूर, नवी मुंबईपाठोपाठ तुकाराम मुंढे पुण्यातही वादग्रस्त; सदस्यांची भाषणे सुरू असतानाच सोडले सभागृह

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   सोलापूर, नवी मुंबईपाठोपाठ तुकाराम मुंढे पुण्यातही वादग्रस्त ठरत आहेत. पालिकेच्या सभागृहात सदस्यांची भाषणे सुरू असतानाच पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर गेले. त्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना सांगूनच सभागृह सोडले होते. परंतु याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. अरविंद शिंदे यांनी ते कुठे गेले अशी […]

सोलापूर, नवी मुंबईपाठोपाठ तुकाराम मुंढे पुण्यातही वादग्रस्त; सदस्यांची भाषणे सुरू असतानाच सोडले सभागृह

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

सोलापूर, नवी मुंबईपाठोपाठ तुकाराम मुंढे पुण्यातही वादग्रस्त ठरत आहेत. पालिकेच्या सभागृहात सदस्यांची भाषणे सुरू असतानाच पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर गेले.

त्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना सांगूनच सभागृह सोडले होते. परंतु याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. अरविंद शिंदे यांनी ते कुठे गेले अशी विचारणा केली. पीठासन अधिकारी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांना ते सांगता आले नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला.

महापौरांना न विचारता गेल्यानं सभागृहाचा अपमान झाला आहे अशी भूमिका घेत त्यांनी मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.  याबाबत खुलासा करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. घोषणा देण्यात आल्या. सत्ताधारी भाजपाची स्थिती या सर्व प्रकरणात अवघड झाली. सभाग्रृह नेते भिमाले विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number