Tukaram Mundhe : निकृष्ट अन्न विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; तुकाराम मुंढेंनी सांगितलं पुढचं टार्गेट, आता थेट रस्त्यावरील…

दूध आणि बनावट पनीरच्या बेकायदेशीर उद्योगांवर कडक कारवाई केल्यानंतर आता मुंढे यांनी आपले पुढील लक्ष्य स्पष्ट केले आहे.

Tukaram Mundhe : निकृष्ट अन्न विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; तुकाराम मुंढेंनी सांगितलं पुढचं टार्गेट, आता थेट रस्त्यावरील…

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या हॉटेल चालकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. दूध आणि बनावट पनीरच्या बेकायदेशीर उद्योगांवर कडक कारवाई केल्यानंतर आता मुंढे यांनी आपले पुढील लक्ष्य स्पष्ट केले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि निकृष्ट 'चायनीज फूड' स्टॉल्सवर लवकरच व्यापक धाडी टाकल्या जातील, असा स्पष्ट संकेत त्यांनी दिला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात रंगला 'अनस्टॉपेबल तुकाराम' संवाद

पुण्यात 'पुणे लोकल' आणि 'माय जनसेवक' यांच्या वतीने आयोजित 'भविष्यवेध' उपक्रमांतर्गत अनस्टॉपेबल तुकाराम या विशेष मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रशासकीय प्रवासासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयीन काळात पुणे विद्यापीठाच्या पाषाण रस्त्यावरील गाड्यांवर पहिल्यांदा चायनीज अन्नपदार्थाची चव चाखल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अशा स्ट्रीट फूडची मागणी प्रचंड वाढली असून, नागरिकांच्या तक्रारी आणि आरोग्याचा धोका लक्षात घेता या चायनीज सेंटरवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या विद्यार्थीदशेतील खडतर दिवसांचे प्रसंग सांगताना तुकाराम मुंढे भावूक झाले. छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेत असताना मेस लावणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने रस्त्यावरील ऑम्लेट-पाव, फरसाण आणि केळी खाऊन दिवस काढावे लागल्याची आठवण त्यांनी शेअर केली. "त्या वेळी ते स्ट्रीट फूड आवडायचे. मात्र आज विचार केला तर त्या गाड्यांवरील तेलाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण होतो," असे ते म्हणाले. अन्न सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण स्वतः गेल्या 2 महिन्यांपासून बाहेरील अन्न पूर्णपणे वर्ज्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Gokul Milk Price Hike: दूध महागणार! 'गोकुळ'च्या म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ

खाद्य भेसळीविरोधात मोहीम अधिक तीव्र होणार

दरम्यान, राज्यात अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, असा सडेतोड इशारा मुंढे यांनी दिला आहे. नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जात्मक अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, स्ट्रीट फूड असो वा मोठे रेस्टॉरंट्स भेसळ आढळल्यास कायदेशीर बडगा उगारला जाईल, यावर त्यांनी भर दिला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number